Gold-Silver Price : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) आज घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होते. मात्र, आज दरात घसरण झाल्यानं सोन्याच्या खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत असली, तरी आज 8 मार्च 2025 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येते, परंतु होळीच्या काही दिवस असतानाच आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
कोणत्या शहरात सोन्याला नेमका किती दर?
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 80,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 80,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,687 रुपये आहे.
पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 80,500 रुपये आणि 87,690 रुपये आहे.
चांदीच्या दराची स्थिती काय?
चांदीच्या फ्युचर्सच्या दरातही तेजीची सुरुवात झाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा बेंचमार्क करार आज वाढीसह उघडला आहे. आज 8 मार्च 2025 रोजी चांदीचा दर 99,200 रुपये प्रति किलो होता. कालच्या तुलनेत चांदीचा दर वाढला आहे. बिझनेस स्टँडर्डनुसार दिल्लीत चांदीची किंमत 992 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 1,079 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर ते 989 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते 989 रुपये प्रति 10 ग्रॅम, लखनऊमध्ये 989 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि जयपूरमध्ये 989 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार
अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून आपल्या परंपरा आणि सणांचाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सण आणि लग्नसमारंभात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. यासोबतच जागतिक बाजारात सोन्याची किंमत, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो.
महत्वाच्या बातम्या: