Silver Price: देशभरात चांदीचे भाव दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करत (Silver Rate) असून चांदीच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. अशातच खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीचा आजचा भाव हा 2, 63, 000 रु GST सह प्रति किलो झालेला आहे. आजवरचा हा सर्वात उच्चांकी भाव असल्याचं चांदीचे व्यापारी सांगतायात. जगभरातील राजकीय परिस्थिती व विकसित देशांमध्ये लागलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे हा भाव सातत्याने वाढत असल्याचं जाणकार सांगत आहेत.
Silver Rate: वर्षभरात चांदीच्या भावात दीडशे पटीने वाढ, प्रति किलो 1 लाख 70 हजारांची वाढ
दरम्यान, एक जानेवारी 2025 ला 90, 500 ₹ प्रति किलो असलेला चांदीचा भाव आज उच्चांकी ने वाढला आहे. चांदीचा भाव जरी वाढत असला तरीही गुंतवणूकदार चांदीमध्ये गुंतवणूक करत असल्याचं समोर आल आहे. मात्र किरकोळ विक्रीत चांदीची भांडी व दागिने यात भाव वाढल्यामुळे प्रचंड घट झाल्याचंही देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीचे व्यावसायिक सांगत आहेत.
Gold Silver Rate: सोन्यापेक्षा चांदीच्या दरानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं कठीण होत आहे. सर्वसामान्य लोक सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. मात्र, काही लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. दरम्यान, सोन्यापेक्षा चांदीच्या दरानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
Gold Silver Rate: पुढील वर्षी 20 टक्क्यां पर्यंत वाढ
दरम्यान, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की पुढच्या वर्षी चांदीच्या किंमतीत असा अपवादात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी असली तरी, मागणी वाढल्यामुळे आणि मर्यादित पुरवठ्यामुळे 2026 मध्ये आणखी 15 टक्के ते 20 टक्के वाढ शक्य आहे.
Gold : जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 12 टनांहून अधिक सोने खरेदी
या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान, विशेषतः तरुणांमध्ये डिजिटल सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या फक्त 11 महिन्यांत 12 टनांहून अधिक सोने खरेदी करण्यात आले. हा WGC अंदाज नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून UPI व्यवहार डेटावर आधारित आहे, जो डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी वापरला जात होता. NPCI ने या वर्षी पहिल्यांदाच हा डेटा जारी केला आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या स्पॉट किमतीच्या आधारे, 12 टन 24-कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ₹16,670 कोटी आहे. उद्योगाच्या अंदाजानुसार, भारतीय 2024 मध्ये अंदाजे 8 टन इतके डिजिटल सोने खरेदी केलं असावं