Horoscope Today 28 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 डिसेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
वाहने सावधानतेने चालवा व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्टसाठी गुंतवणूक कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
महिलांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन मिळेल घरातील लोकांच्या भावनांचा विचार करावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देत राहिल्यामुळे संधी निघून जाऊ शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
जोडीदाराशी झालेल्या वैचारिक मतभेदांमध्ये तुम्हाला दोन पावले मागे यावे लागणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज कोणतेही टोकाचे निर्णय घ्यायचे नाहीत असे ठरवून टाका महिलांना घरातील जबाबदाऱ्या सांभाळावे लागतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज हट्टीपणामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल कोणताही अहंकार ठेवू नका.
तूळ रास (Libra Horoscope Today)
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या म्हणीनुसार वागणूक ठेवावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कितीही अडथळे आले तरी स्वतःची प्रगती करून घ्याल घरातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही हात राखून खर्च कराल त्याची थोडी चर्चा होईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
लहान लहान गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी जास्त निराश होऊ नका कारण परिस्थिती सुधरेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
महिला जरा जास्तच एकलकोंड्या बनतील परंतु समाजात मान वाढेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
बुद्धीच्या जोरावर अनेक क्षेत्रे पादाक्रांत कराल व्यवसायात इतरांच्या मनाचा विचार जास्त कराल.
हे ही वाचा :