Gold Silver Rate Today : लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटनुसार, आज म्हणजेच बुधवार 29 नोव्हेंबर रोजी देशात (India Gold Price Today) सोने-चांदीच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,735 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,256 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा उच्चांक
मंगळवारच्या सलग चौथ्या सत्रात सोन्याचा भाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने सहा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. डॉलर घसरल्याने आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याचा हा परिणाम आहे. मंगळवारी स्पॉट गोल्ड 1.4 टक्क्यांनी वाढून 2,041.55 डॉलर प्रति औंस झाला. 10 मे पासूनचा हा सर्वाधिक भाव आहे. डिसेंबरसाठी यूएस सोन्याचे वायदे 1.4 टक्क्यांनी वाढून 2,040 डॉलरवर स्थिरावले आहेत.
सलग दोन दिवस सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. पण आज सोने-चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 5,735 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,256 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज मुंबईत शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा दर 62,560 रुपये आहे.
चांदीची किंमत काय?
आज चांदीची किंमत (29 November 2023 Silver Price Today) 78,500 रुपये प्रति किलो आहे. सोन्याप्रमाणे आज चांदीचा दरही स्थिर आहे. पण, गेल्या दिवाळीनंतर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो होती, ती आता 78,500 वर पोहोचली आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - सोन्याचा भाव 62710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - सोन्याचा दर 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 62590 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
- नागपूर -62560 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 62560 रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)