Gold Rate 22 November 2022 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीत (Gold-Silver Rate) वाढ होताना दिसली. सोने-चांदीच्या किंमतींतही गेल्या आठवडाभर अस्थिरता दिसून येत होती. मात्र काल आठवड्याची सुरूवात ग्राहकांसाठी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली.दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव


 


आजचा सोन्याचा भाव काय?
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,350 रुपये
24 कॅरेट साठी 52,750 रुपये 
10 ग्रॅम चांदीचा दर 61,200 रुपये आहे. 



तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750  
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 48,350
1 किलो चांदीचा दर - 61,200


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350
1 किलो चांदीचा दर - 61,200


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350
1 किलो चांदीचा दर - 61,200


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350
1 किलो चांदीचा दर - 61,200


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,900
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,500
1 किलो चांदीचा दर - 61,200


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,350
1 किलो चांदीचा दर - 61,200


जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


हॉलमार्क लक्षात ठेवा
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहूनच ग्राहक खरेदी करतात. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.


मिस्ड कॉलद्वारे किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.


इतर महत्वाच्या बातम्या


Kaynes Technology Listing Price: केन्स टेक्नॉलॉजीची शेअर बाजारात दमदार एन्ट्री, गुंतवणूकदारांना बंपर फायदा