Gold Rate Today : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने तुम्हालाही सणवारांसाठी दागिने खरेदी करायची असेल तर हीच वेळ आहे. कारण मागच्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold and Silver Rate) किंचित वाढ होताना दिसतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.20 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,740 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 57,890 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,428 57,890
पुणे 47,428 57,890
नाशिक  47,428 57,890
नागपूर 47,428 57,890
दिल्ली 47,346 57,790
कोलकाता  47,364 57,820

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :