Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात काहीशी अस्थिरता पाहायला मिळतेय. बुलियन्सच्या वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,000 रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 63,950 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई 47,667 63,950
पुणे 47,667 63,950
नाशिक 47,667 63,950
नागपूर 47,667 63,950
दिल्ली 47,584 63,840
कोलकाता  47,603 63,860

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :