Gold Rate Today : ग्राहकांना जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही चांगली संधी आहे. यूएस फेड रिझर्व्हने (US Federal Reserve) सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे डॉलरचा निर्देशांक 20 महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. डॉलरचा निर्देशांक वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) घसरण झाली आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,650 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 57,260 रुपये आहे. 


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  49,650
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 45,513


1 किलो चांदीचा दर - 57,260


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  49,650  
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,513


1 किलो चांदीचा दर - 57,260


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,650
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,513


1 किलो चांदीचा दर - 57,260


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,650


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,513


1 किलो चांदीचा दर - 57,260


दिल्लीमधील सोन्याचे दर   


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,560


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,430


1 किलो चांदीचा दर - 57,180


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,580


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 45,448


1 किलो चांदीचा दर - 57,210


जागतिक बाजारात दर :


जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत एक टक्का घसरण झाली असून तो 1,656.97 डॉलर प्रति औंस झाला आहे. यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. यासोबतच भविष्यातही त्यात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे डॉलर आणि रोख उत्पन्नात वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांकही 20 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे इतर चलनांच्या गुंतवणूकदारांना सोने खरेदी करणे अधिक महाग झाले आहे.


तुमच्या शहराचे दर तपासा : 


आता ग्राहक घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, यामध्ये तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.


महत्वाच्या बातम्या :