Gold Silver Price Today : रशिया युक्रेनमधील युद्धाला जवळपास एक महिना होत आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वर-खाली होत असताना आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रूपये झाला आहे. काल हा दर 47,300 होता. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. याचबरोबर इतर शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत ते जाणून घेऊयात.
सोन्या-चांदीचे ताजे दर :
एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स 0.31 टक्क्यांनी वाढून 159 रूपयांनी 24 कॅरेट सोन्याचा दर 51,814 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर, चांदीचा दर 0.46 टक्क्यांनी वाढून 317 रूपयांनी वाढून 68,666 रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
22 मार्च 2022 तुमच्या शहरातील दर काय आहेत ?
मुंबई 47,400
पुणे 47,500
नाशिक 47,650
नागपूर 47,480
दिल्ली 47,300
कोलकाता 47,400
चेन्नई 47,930
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या :
स्पॉट गोल्ड 0105 GMT पर्यंत 0.2 टक्क्यांनी घसरून $1,931.84 प्रति औंस झाला. US सोन्याचे दर $1,930.20 वर सपाट होते. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी घसरून $25.15 प्रति औंस, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून $1,033.99 वर आले.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :