Gold Rate Today : आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार. मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर (Gold-Silver Rate) वाढले होते. त्या दरात आज किंचीत फरकाने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,630 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 60,660 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,630
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,244
1 किलो चांदीचा दर - 60,660
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,630
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,244
1 किलो चांदीचा दर - 60,660
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,630
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,244
1 किलो चांदीचा दर - 60,660
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,630
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,244
1 किलो चांदीचा दर - 60,660
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,540
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,162
1 किलो चांदीचा दर - 60,550
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,560
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,180
1 किलो चांदीचा दर - 60,580
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Todays Listing: शेअर बाजारात आज दोन कंपन्यांची लिस्टिंग; गुंतवणूकदारांची घोर निराशा