Todays Gold Rate : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशात सोन्यामध्ये (Gold Rate) गुंतवणूक करणे ही महत्वाची गुंतवणूक समजली जाते. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. म्हणून अनेक जण सोने खरेदी करून त्यात गुंतवणूक करतात. गेल्या 15 दिवसात चांदीच्या (Silver Rate) किंमतीत झपाट्याने चढ उतार दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीं कालच्या प्रमाणेच जैसे थे आहेत. तर चांदीच्या किंमतींमध्ये 300 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. जाणून घ्या
जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भावइंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 50,100 रुपये प्रति तोळा आहे. याचप्रमाणे 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54640 रुपये प्रती तोळा आहे. सराफा बाजारात आज चांदीचे दर अंदाजे 69300, रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. काल त्या अंदाजे 69000 रुपये प्रती किलो होत्या. कालच्या तुलनेत त्यात तब्बल 300 रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचा भाव जाणून घ्या.
शहर 22 कॅरेट सोने (रु.प्रती तोळा) 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) चांदी (रु.प्रती किलो)चेन्नई 50560 55160 73000मुंबई 49950 54490 69300नवी दिल्ली 50100 54640 69300कोलकाता 49950 54490 69300बंगळूरु 50000 54490 73000हैदराबाद 49950 54450 73000केरळ 49950 54490 73000पुणे 49950 54490 69300बडोदा 50000 54540 69300
सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity)
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या