Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे (Gold-Silver Rate) जे वाढते दर होते. हे दर आज किंचित फरकाने कमी झाले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी, तसेच इतर विधींसाठी ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,970 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,480 रुपये आहे.  


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  52,970
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 48,556


1 किलो चांदीचा दर - 61,480


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,000
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,583


1 किलो चांदीचा दर - 61,590


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,000
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,583


1 किलो चांदीचा दर - 61,590


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 53,010


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,593


1 किलो चांदीचा दर - 61,590


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,920


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,510


1 किलो चांदीचा दर - 61,480


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,940


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,528


1 किलो चांदीचा दर - 61,500


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  


महत्वाच्या बातम्या : 


Share Market Opening Bell: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; घसरणीनंतर बाजार किंचीत वधारला