Gold Rate Today : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान अनेकजण गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी सोन्याचं नाणं खरेदी केलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्या-चांदीच्या दराने (Gold-Silver Rate) उच्चांक पातळी गाठली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,420 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,470
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,764
1 किलो चांदीचा दर - 69,420
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,470
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,764
1 किलो चांदीचा दर - 69,420
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,470
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,764
1 किलो चांदीचा दर - 69,420
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,470
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,764
1 किलो चांदीचा दर - 69,420
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 56,370
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,673
1 किलो चांदीचा दर - 69,300
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 56,390
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,691
1 किलो चांदीचा दर - 69,330
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
India Budget 2023: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यात होणार अधिवेशन