Gold Rate Today : मे महिना म्हणजेच लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. भारतीय बाजारपेठेत ग्राहकांनी सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आजचे सोन्या-चांदीचे दर नेमके काय सांगतायत ते जाणून घेणार आहोत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.54 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 60,130 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

शहरसोने1 किलो चांदीचा दर 
मुंबई47,07160,130
पुणे47,07160,130
नाशिक47,07160,130
नागपूर47,07160,130
दिल्ली47,00760,050
कोलकाता46,98860,030

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :