Gold Price Prediction नवी दिल्ली: सोन्याच्या दरात काही दिवस घसरण झाल्यानंतर पुन्हा तेजी सुरु झाली आहे. आता सोने नवा उच्चांक गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या व्याज दर कपाती संदर्भातील निर्णय आणि आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत काय घडतं याबाबत गुंतवणूकदारसतर्क असतील. अमेरिकेतील नोकरी आणि महागाईचे आकडे, रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध थांबवण्यासंदर्भातील करार या घटना देखील सोने दरावर प्रभाव टाकू शकतात.  

Continues below advertisement

पीटीआयनुसार , जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे ईबीजी -कमोडिटी आणि करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांनी सोनं कन्सोलिडेशन रेंजमधून बाहेर पडत आहे. कारण गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या भागातील उत्पादन आणि सर्व्हिसेसचा पीएमआय डेटा, यूस जॉब डेटा आणि ग्राहकांच्या प्रतिसादावर लक्ष देत आहेत. सोमवारी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे देखील गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. याशिवाय रशिया- यूक्रेन शांतता चर्चेची प्रगती आणि शुक्रवारी आरबीआयच्या पतधोरण समितीकडून जाहीर केला जाणारा रेपो रेट याकडे सर्व ट्रेडर्सचं लक्ष असेल.  

Gold Rate : आंतररराष्ट्रीय बाजारात सोनं महागलं

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी 2026 च्या वायद्याचे सोन्याचे दर 3654 रुपयांनी महागले. शुक्रवारी सोनं 129504 रुपयांवर पोहोचलं होतं.  गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर डिलिव्हरीसाठी कॉमेक्स गोल्ड फ्यूचर्समध्ये 138.8 अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली. शुक्रवारी एक औस सोन्याचा दर 4218.3 अमेरिकन डॉलर इतका होता.  

Continues below advertisement

भारतीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ उतार, देशांतर्गत मागणी याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. एंजेल वनचे प्रथमेश माल्या यांच्या मतानुसार सणांच्या काळात आणि लग्नसराई निमित्त सोन्याची आणि दागिन्यांची सातत्यानं खरेदी सुरु असल्यानं दरांमधील तेजी कायम आहे. जगभरातील केंद्रीय बँका येत्या काळात देखील सोने खरेदी सुरु ठेवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तज्ज्ञांच्या मते सोनं येत्या काळात उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. कारण यूएस फेडकडून व्याज दरात कपातीची श्यता, अमेरिकेचा डॉलर कमजोर होणं आणि भूराजनैतिक अनिश्चिततांच्या काळात सोन्याची मागणी सुरक्षित पर्याय म्हणून कायम राहील.