Gold : सध्या दिवाळीचा सण सुरु आहे. या सणात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जात. विशेषत: आज धनत्रयोदशी आहे. आजचा दिवस सोने खरेदीच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळं सोन्याची खरेदी करण्यापूर्वी 


तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करताना हॉलमार्किंगसारख्या अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. गर्दीमुळं या दिवशी सोन्याच्या खरेदीबाबत फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही सोन्याची वस्तू खरेदी करत आहात, त्यावरील हॉलमार्किंग नक्कीच तपासा. तुमची खरेदी योग्य आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसे देत आहात याची खात्री करा. खरेदीनंतर बील घ्या. बिल घेण्याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला अडचणी येणार नाहीत.


प्रमाणित बिल घेणं गरजेचं


ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, जर तुम्ही किरकोळ विक्रेत्याकडून किंवा ज्वेलर्सकडून हॉलमार्क केलेले दागिने विकत घेत असाल, तर त्याच्याकडून प्रमाणित बिल किंवा इनव्हॉइस घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचे वाद, गैरवर्तन किंवा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचे बिल कसे असावे आणि त्यात कोणत्या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करत आहात. 


उदा: तुम्ही जर 8 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची साखळी खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत, तुमचा ज्वेलर्स तुमच्या बिलावर, इनव्हॉइसवर किंवा चलनावर असे काहीतरी लिहील


1) दागिन्याचे नाव आणि तपशील 
2) प्रमाण: 1
3) वजन (ग्रॅम): 8 ग्रॅम
4) शुद्धता: 22KT
5) सध्याचे सोन्याचे दर आणि मेकिंग चार्जेस
6) हॉलमार्किंग फी: 35 रुपये + GST
7) खरेदीदाराद्वारे देय असलेली एकूण रक्कम


बिल हे पूर्णपणे वैध व्यवहारावर आधारित असते 


खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता
दागिन्यांचे नाव आणि कोड
तुम्ही किती सोन्यासाठी पैसे देत आहात 
ज्वेलर्सचा GST ओळख क्रमांक


महत्त्वाच्या बातम्या:


गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरांत दुप्पट वाढ, यंदा सोनं 60 हजारांवर, पाच वर्षांपूर्वीची किंमत काय?