Gold Silver Price : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. पुढच्या काही दिवसातच दिवाळीचा सण येणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. तसेच धनत्रयोदशीदिवशी मोठ्या प्रमाणावर लोक सोन्या चांदीची खरेदी करतात. पण सध्या सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसुन येत आहे. 2023 या वर्षात सोन्याच्या किंमतीचा तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. 


चांदीच्या दराची स्थिती काय 


27 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 71 हजार 717 रुपये प्रति किलो होता. 3 ऑक्टोबर 2023 रोजी चांदीचा भाव हा 72 हजार 252 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. म्हणजेच एका आठवड्यात चांदीच्या दरात 535 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात चांदीच्या दरात 0.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल चांदीच्या दरात 852 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी चांदीचा भाव 71,400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.


सोन्याच्या किंमतीतही वाढ


काल सोन्याच्या दरात 109 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 3 ऑक्टोबर रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 20 रुपये झाला आहे. तर गेल्या आठवडाभरात सोने स्वस्त झाले आहे. या काळात सोन्याच्या भावात 136 रुपयांनी घट झाली आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 61 हजार 156 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. या संदर्भात, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 0.22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.


दिवाळीत सोन्याचा दर काय असू शकतो?


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. याचे प्रमुख कारण म्हणजे सोन्याची वाढती मागणी. जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की केंद्रीय बँकांकडून मागणी आणि खरेदी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असून त्याचा परिणाम चांदीच्या दरावर दिसून आला आहे. हा ट्रेंड आगामी काळातही कायम राहू शकतो.


दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी


दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत 120 टन सोन्याची खरेदी झाली आहे. राज्यात 700  कोटींच्या जवळपास उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत  तिसऱ्या तिमाहीत सोन्याची  7 टक्के अधिक आयात झाली आहे. दसऱ्याला 120  टन सोन्याची उलाढाल झाली आहे. दिवाळीदरम्यान  साधारण 300 टन सोन्याची विक्री होण्याचा अंदाज आहे.  त्यामुलं सोनं 64 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जे चित्र सोन्याच्या बाजारात आहे. तेच चित्र इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. दिवाळीत खरेदीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर वाहन खरेदीतही अशीच तेजी पहायला मिळतेय. एकूणच काय तर रिअल इस्टेट, वाहन क्षेत्र, सोनं व्यापाराला अच्छे दिन आलेत.


महत्त्वाच्या बातम्या:


सोने आणि रिअल इस्टेटला अच्छे दिन! मुंबईत 10 महिन्यात एक लाखांहून अधिक घरांची विक्री तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 120 टन सोन्याची खरेदी