नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 मध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरातील वाढीनं मोठे उच्चांक निर्माण केले आहेत. मात्र, 2025 च्या शेवटच्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. नववर्षात देखील सोने आणि चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात 3000  रुपयांची घसरण झाली आहे.

Continues below advertisement

सोन्याच्या दरात मोठी घसरण

2025 च्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. 2026 च्या पहिल्या आठवड्यात देखील  घसरण चालू राहिली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 4121 रुपयांची घसरण झाली आहे. 26 डिसेंबर 2025 ला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 फेब्रुवारीच्या वायद्याच्या 24 कॅरेट सोन्याचा दर 139873 रुपये होते. त्यात 10 ग्रॅमची घसरण होऊन ते 2 जानेवारीलला  135752 रुपयांवर पोहोचले आहेत. 

सोन्याच्या दरात ज्या प्रमाणात घसरण झाली, त्या प्रमाणात चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरानं 140456 रुपयांवर पोहोचले होते. तिथून सोन्याच्या दरातून घसरण होऊन ते 135752 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच सोन्याचे दर 4704 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 

Continues below advertisement

चांदीच्या दरात घसरण 

ज्याप्रमाणं सोन्याचे दर घसरले आहेत, त्याप्रमाणं चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 3188 रुपयांची घसरण झाली. 26 डिसेंबर 2025 ला चांदीचा दर 239787 रुपये होता. गेल्या आठवड्यात चांदीच्य दरात 726 रुपयांची वाढ झाली होती. मात्र, चांदीच्या दरात घसरण होऊन ते 236599 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातील उच्चांकाचा विचार केला असता 1 किलो चांदीचे दर 254174  रुपयांवर पोहोचले होते. तेव्हापासून चांदीचे दर 17575 रुपयांनी कमी झालेले आहेत. 

2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याचं कारण जागतिक स्तरावरील अस्थिरता हे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थितरता असल्यास गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्यानं गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत असतात. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचा वापर औद्योगिक कारणासाठी वाढला आहे. त्यामुळं चांदीची मागणी वाढली आहे, त्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं चांदीचे दर वाढले आहेत.