Silver Price : सध्या सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांना अवघड झालं आहे. कारण दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान, सध्या चांदीच्या दरात (Silver Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र दिलसत आहे. एका दिवसात चांदीच्या दरात 5200 रुपयांची वाढ दिसून आली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात 5200 रुपयांची झालेली वाढ ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे.
दिल्लीत प्रतिकिलो चांदीसाठी मोजावे लागतायेत 95000
कमोडिटी मार्केटमध्ये आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. MCX वर सोन्याची किंमत 191 रुपयांनी कमी होऊन 76325 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर चांदी सध्या 89158 रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. चांदीच्या दरात इतकी प्रचंड म्हणजे एका दिवसात 5200 रुपयांची झालेली वाढ का झाली? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दिल्लीत चांदीच्या भावात 5200 रुपयांची वाढ ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तिथे 95,000 रुपये प्रति किलोच्या पातळीवर चांदी पोहोचली आहे. मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थ (MOPW) ने चांदीवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की 1990 ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत चांदीने अस्थिरता दर्शविली आहे. कमी-अधिक प्रमाणात भारतीय समभागांप्रमाणे कामगिरी केली आहे.
चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांदीच्या दरात MCX वर मोठी वाढ झाली होती. चांदी 1 लाख रुपयांच्या पुढे गेली होती. गुंतवणूकदारांना चांदी खरेदी करण्याच्या संधी अजूनही आहे. कारण अनेक कमोडिटी तज्ञांनी भविष्यात चांदीच्या सरासरी परताव्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एमसीएक्सवर त्यांनी 1.25 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच 1.25 लाख रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सोन्यात जशी गुंतवणूक सुरक्षित मानली जाते तशीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिले जात आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये चांदीकडे आकर्षण वाढले आहे. भारतात सणासुदीच्या काळात चांदीला मागणी वाढल्याने किंमतीही वाढल्या आहेत. भारतातील चांदीच्या किमती आर्थिक आणि जागतिक कारणांमुळे प्रभावित झाल्या आहेत. दरम्यान, येणाऱ्या काळात देखील चांदीच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: