Gold Price News : सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकंसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण आज सोन्याच्या दरानं (Gold Price) नवा उच्चांक गाठला आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 71 हजार 600 वर पोहोचला आहे. मुंबईत 10 ग्राम सोन्याची खरेदी करण्यासाठी 71 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, मागील 3 ते 4 दिवसात सोन्याच्या दरात मोठी वृद्धी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


खरेदीदारांच्या खिशाला मोठी कात्री


दिवसेंदिवस सोनं अधिकच महाग होत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. 71 हजार 600 हा सोन्याला आत्तापर्यंत मिळालेला उच्चांकी दर आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम सोन्यानं मोडीत काढले आहेत. वाढत्या सोन्याच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होत आहे. सोन्याच्या या स्थितीमुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.


वाढत्या सोन्याच्या दरामुळं सोनं खरेदी करण्याकडे अनेकांची पाठ


दरम्यान, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. मात्र, अशातच गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना रों घेणं परवडत नाही. कारण सोन्याची खरेदी करणं आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळं लग्नसराईसाठी सोन्याची खरेदी कशी करावी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक नागरिक वाढत्या सोन्याच्या दरामुळं सोनं खरेदी करण्याकडे पाठ करत आहेत.


एका बाजूला देशांतर्गत बाजारात जरी सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असली तरी दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळं अनेकजण सोन्यात गुंतवणूक करणं पसंत करत आहेत. सोन्यातील गुंतवणूक की मोठी फायद्याची ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.


महत्वाच्या बातम्या:


सोन्यानं गाठली विक्रमी पातळी, सोन्याची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर