Gold Silver Price: सोने चांदीचे दर (Gold Silver Price) काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर हा 61,960 रुपये आहे. काल हाच सोन्याचा दर 61,950 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा आज 67,580 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात वाढ झालीय. काल उत्तर प्रदेशमध्ये सोन्याचा दर हा 66480 रुपये होता.
दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सोन्याची खरेदी करणं सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळं ग्राहक सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या चांदीच्या मोठ्या प्रमाणात उलाढाल, खरेदी होत असते. मात्र, वाढत्या दराचा खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
शहर - 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
लखनौ - 61,960 रुपये 67,580 रुपये गाजियाबाद - 61,960 67,580 नोएडा - 61,960 67,580आग्रा - 61,960 67,580अयोध्या - 61,970 67,590मुंबई - 61800 67420नवी दिल्ली - 61950 67570चेन्नई - 62350 68020
चांदीच्या दरात किती वाढ
दरम्यान, सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा दर हा प्रतिकिलो 78,600 रुपये आहे. काल हाच चांदीचा दर 78,500 रुपये होता. दरम्यान सोन्याच्या चांदीच्या दराबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या नंबरवर मीस कॉल देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या: