Gold Silver Price Today: सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे.  यामुळं, सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होताना दिसत आहे. आज पुन्हा सोन्याचा दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये बुधवारी (31 जानेवारी) सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. बाजार सुरू होताच सोने 200 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर चांदीच्या दरातही प्रति किलो 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्याची किंमत 76500 रुपये झाली आहे. कर आणि एक्साईज ड्युटीमुळं सोन्या-चांदीची किंमत दररोज वाढत आहे.


31 जानेवारी रोजी वाराणसीच्या सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून 58150 रुपयांवर पोहोचला. यापूर्वी 30 जानेवारीला त्याची किंमत 57950 रुपये होती. तर 29 जानेवारीला त्याची किंमत 57850 रुपये होती. यापूर्वी 28 जानेवारीला त्याची किंमत 57950 रुपये होती, 27 जानेवारीला त्याची किंमत हीच होती, तर 26 जानेवारीला त्याची किंमत 57850 रुपये होती. त्यापूर्वी 25 जानेवारीला त्याची किंमत 57900 रुपये होती.


24 कॅरेटच्या भावात 220 रुपयांची वाढ 


22 कॅरेट व्यतिरिक्त, जर आपण 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो तर आज त्याची किंमत 220 रुपयांनी वाढून 63450 रुपये झाली. तर 30 जानेवारीला त्याची किंमत 63230 रुपये होती. सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव कधी वर जात आहेत तर कधी खाली येत आहेत.बाजाराचा कल भविष्यातही असाच राहील अशी अपेक्षा आहे.


चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ


सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 300 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. त्यानंतर बाजारात चांदीचा भाव 76500 रुपये झाला आहे. तर 30 जानेवारीला त्याची किंमत 76200 रुपये होती. 29 जानेवारीला त्याची किंमत 76000 रुपये होती. तर 28 जानेवारीला त्याची किंमत 76500 रुपये होती. त्यापूर्वी 26 जानेवारीला त्याची किंमत 76000 रुपये होती. तर 25 जानेवारीला त्याची किंमत 75300 रुपये होती. त्यापूर्वी 24 जानेवारीला त्याची किंमत 75000 रुपये होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Gold Rate Today : सोने दरवाढीतून दिलासा, चांदी मात्र महागली; आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?