Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होत आहे. आजही पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ (Gold and Silver price increased) झाल्याचे दिसून आले आहे. सध्या बाजारात सोन्याचे दर हे 65 हजारांच्या पुढे गेले आहेत. तर दुसरीकडं चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव हा 73 हजार रुपये किलो आहे. राष्ट्रीय स्तरावरचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याला 10 ग्रॅमसाठी 65795 रुपये द्यावे लागत आहेत. तर 1 किलो चांदीसाठी 73859 रुपये द्यावे लागत आहेत. 


दरम्यान, 22 कॅरेट सोन्यासाठी 60268 रुपये द्यावे लागत आहेत. तर 24 कॅरेट सोन्याला 10 ग्रॅमसाठी 65795 रुपये द्यावे लागत आहेत.  दरम्यान, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 206 रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. होळीच्या सणापूर्वीच बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


कोणत्या शहरात सोन्याला किती दर?


दिल्लीतही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीच 22 कॅरेट सोन्याला 60960 रुपयांचा दर आहे. तर दुसरीकडं 24 कॅरेट सोन्याचा दर हा  66,490 रुपये आहे. हा दर 10 ग्रॅम सोन्यासाठी आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याला 60810, तर 24 कॅरेट सोन्याला 66340 रुपयांचा दर झाला आहे. लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 60,960 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66,490 रुपये आहे. 


Gold-Silver Rate : सोने चांदीची खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. याचा मोठा फटका सोन्याची खरेदी करणाऱ्यांना बसत आहे. कारण सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. पण सध्या सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळं अनेक लोक सोने चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान, बाजारात सोन्या चांदीला असणारी मागणी आणि होणारा पुरवठा यावर दराचे गणित ठरवले जाते. सोन्याची मागणी वाढल्यास दरातही मोठी वाढ होते. तर सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होण्याची शक्यता असते.


महत्वाच्या बातम्या:


सोनं चांदी महागलं, लग्नसराईत खरेदीदारांच्या खिशाला झळ, कोणत्या शहरात किती दर?