Loan Against Shares : काहीवेळा विशिष्ठ परिस्थितीमध्ये तुम्हाला तातडीने पैशांची गरज असते. यासाठी तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवून कर्जही घेऊ शकणार आहात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळेल. तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेले कर्ज तुम्ही वापरू शकाल. ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसची (NBFC) शाखा जिओजित क्रेडिट्सने शेअर्सवर कर्ज देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला. जिओजित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL) कोणत्याही डिमॅट खातेधारकाला शेअर्सवर डिजिटल पद्धतीने कर्ज देणारी पहिली कंपनी ठरली आहे. (Geojit launches platform for loan against shares)
moneycontrol.com च्या मते, कोचीमधील NSDL च्या मॅनेजिंग डायरेक्टर पद्मजा चंद्रू यांनी सांगितले की गुंतवणूकदारांना त्वरित लिक्विडिटी प्रदान करण्यासाठी ही डिजिटल LSA अर्थात लोन अग्नेस्ट शेअर्स सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी निधी प्रदान करणे किंवा तत्काळ वैयक्तिक खर्च पूर्ण करण्यात मदत करणे हा आहे.
कोणाला कर्ज मिळू शकते -
जिओजित ग्रुपचे संस्थापक आणि एमडी सी.जे. जॉर्ज यांनी या सुविधेच्या लॉन्चिंगच्या समारंभात सांगितले की, जे ग्राहक एलएएस डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे शेअर्स गहाण ठेवून कर्जासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्याकडे त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये पात्र समभाग विनामूल्य असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचा CIBIL स्कोअर समाधानकारक असावा. NSDL मध्ये डिमॅट खाते असलेले सर्वजण या सुविधा अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. दलाल कोण आहे याने काही फरक पडत नाही.
ऑनलाइन कर्ज मिळवा -
सी. जे जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या आवडीची योजना निवडू शकाल आणि सर्व कागदपत्रे ऑनलाइन करू शकाल. कर्जाच्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर आणि मंजूर झाल्यानंतर रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि वापरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाईल.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live