Indian Economy : चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील GDP चा डेटा उद्या (30 नोव्हेंबर 2023) रोजी घोषित केला जाणार आहे. पहिल्या तिमाहीप्रमाणे दुसऱ्या तिमाहीतही आर्थिक विकास दर उत्कृष्ट राहण्याची अपेक्षा आहे. आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनीही दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचे आकडे चांगले राहतील अशी आशा व्यक्त केली आहे. आरबीआयने दुसऱ्या तिमाहीत GDP 6.5 टक्के होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


दुसऱ्या तिमाहीचे आकडे चांगले असणार


सांख्यिकी मंत्रालय दुसऱ्या तिमाहीसाठी जीडीपीची आकडेवारी जाहीर करणार आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर 7.8 टक्के होता. दुसऱ्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झाली आहे. आर्थिक व्यवहार सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीचे आकडे चांगले असतील. अन्न अनुदानावरील खर्चात वाढ झाली असली तरी वित्तीय तूट 5.9 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. पाच वर्षांसाठी अन्न अनुदानात वाढ करुनही वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे ते म्हणाले. सरकारने 2025-26 पर्यंत वित्तीय तूट 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


दरम्यान, 6 ऑक्टोबर 2023 रोजी चलनविषयक धोरण जाहीर करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, शहरी भागात मागणी वाढल्यानं वापर वाढला आहे. तर ग्रामीण भागातही मागणीत सुधारणा दिसून येत आहे. सेवा, ग्राहकमध्ये  वाढ चांगली असून सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होत आहे. बँका आणि कॉर्पोरेट्सच्या ताळेबंदात सुधारणा झाली आहे, पुरवठा साखळी सुधारली आहे. पण आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, जागतिक तणाव आणि आर्थिक आव्हाने सर्वात मोठा धोका निर्माण करतात.


आरबीआयने 2023-24 साठी 6.5 टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवले आहे. तर सेंट्रल बँकेचा असा विश्वास आहे की दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 6.5 टक्के असेल. तर जीडीपी तिसऱ्या तिमाहीत 6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Digital Economy: डिजिटल परिवर्तनात भारत पुढे, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा; एकूण GDP मध्ये होणार 20 टक्के योगदान