Gautam Adani Owned ACC LTD : मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या गौतम अदानींसाठी (Gautam Adani) 2024 वर्षाची सुरुवात अगदी सकारात्मक ठरली आहे. एकीकडे जगातील अव्वल अब्जाधीशांच्या (World's Top Billionaires) यादीत गौतम अदानींचा दबदबा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अदानींच्या साम्राज्यात नवनव्या कंपन्यांची भर पडत आहे. अदानींनी 2024 मधील त्यांची सर्वात मोठ्या डिलवर मोहोर लावली आहे. 2024 मधील पहिली मोठी खरेदी केली आहे. अदानी समूहानं सिमेंट क्षेत्रातील दिग्गज ACC लिमिटेडनं (ACC Ltd) ACCPL नावाच्या कंपनीचं अधिग्रहण पूर्ण केलं आहे.


2024 मधील अदानींची सर्वात मोठी खरेदी 


बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या अहवालानुसार, सोमवारी 8 जानेवारी रोजी अदानी समुहाची कंपनी ACC लिमिटेडनं Asian Concretes and Cements Private Limited (ACCPL) चं अधिग्रहण पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता सिमेंट क्षेत्रात अदानी समुहाचं वर्चस्व वाढणार हे मात्र नक्की. अशातच अदानींनी हा करार तब्बल 775 कोटी रुपयांना पूर्ण केला आहे. नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करत अदानींनी सिमेंच क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आपल्या नावे केली आहे. अदानी आणि एसीसी लिमिटेडमध्ये झालेल्या या कराराचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले. सकाळच्या सत्रात ACC Ltd चे शेअर्स 2350 रुपयांवर व्यवहार करत होते. 


ACC कडे कंपनीची संपूर्ण मालकी 


महत्त्वाची बाब म्हणजे, ACC लिमिटेड ही अदानी समुहाच्या सिमेंट फर्म अंबुजा सिमेंटची  (Ambuja Cement) सब्सिडियरी कंपनी आहे. या कंपनीकडे आशियाई काँक्रीट आणि सिमेंट्समध्ये आधीच 45 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. आता कंपनीनं आपल्या विद्यमान प्रवर्तकांकडून उर्वरित 55 टक्के भागभांडवल देखील विकत घेतलं आहे. त्यानंतर ACCPL ची संपूर्ण मालकी ACC कडे आली आहे. या 55 टक्के भाग भागभांडवलं खरेदीची किंमत 425.96 कोटी रुपये आहे. 


शेअर बाजारात (Share Market) देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या वतीनं या कराराबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच, असंही सांगण्यात आलं आहे की, हा करार आंतरराष्ट्रीय सोर्सेसकडून फंडिंग करण्यात आलं आहे. एसीसीपीएलबाबत बोलायचं झालं तर, या कंपनीची नालागढमध्ये 1.3 MTPA सीमेंट कपॅसिटी आहे. तसेच, याची सहाय्यक कंपनी एशियन फाइन सीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (AFCPL) ची पंजाबच्या राजपुरामध्ये 1.5 MTPA सीमेंट कॅपेसिटी आहे. या अधिग्रहणानंतर आता एसीसी लिमिटेडची सीमेंट कपॅसिटी वाढण्यास मदत मिळणार आहे. 


'या' वर्षातील अदानींची सर्वाधिक कमाई 


एकिकडे गौतम अदानी आपला व्यावसाय वाढण्यासाठी नवनव्या डिल्स करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या नेटवर्थमध्येही दिवसागणिक वाढ पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनं दिलेल्या माहितीनुसार, Gautam Adani Net Worth 94.5 अरब डॉलरवर पोहोचलं आहे. या आकड्यासह गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत चौदाव्या स्थानावर पोहोचले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी इतर अब्जाधीशांना मागे टाकत यंदाच्या वर्षात 10.2 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.