Gautam Adani Net Worth : जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी ब्लूमबर्गनं जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचा देखील समावेश आहे. या यादीत भारतातील सर्वातं श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे 13 व्या क्रमांकावर आहेत. तर उद्योजक गौतम अदानींचा (Gautam Adani) पुन्हा श्रीमंतांच्या  20 नावांमध्ये समावेश झाला आहे.  


देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा जगातील 20 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या समूहाचे बाजारमूल्य 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीनंतर ते ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप-20 मध्ये सामील झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 6.5 अब्ज डॉलर्सने वाढून 66.7 अब्जांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी ते या यादीत 22 व्या स्थानावर होता.


शेअर्समध्ये प्रचंड वाढ


मंगळवारी अदानी समूहाच्या समभागात कमालीची वाढ दिसून आली. अदानीच्या केवळ एका शेअरमध्ये 20 टक्क्यांची मोठी उडी नोंदवली गेली आणि इतर सूचीबद्ध समभागांनीही उसळी घेतली. त्यामुळे समूहाच्या बाजार भांडवलात 1 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली. सोमवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये अदानीचे लिस्टेड शेअर्स 10.27 लाख कोटी रुपये होते, जे मंगळवारी 11.31 लाख कोटी रुपये झाले. अशा स्थितीत 1.04 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही पहिलीच वेळ होती की समूहाचे शेअर्स इतके वाढले होते.


अदानींचे शेअर्स का वाढले?


हिंडेनबर्ग प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली असून न्यायालयाने गेल्या आठवड्यातच या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला आहे. या वृत्तानंतर अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा वाढू लागले आहेत.


भारताचे मुकेश अंबानी 13व्या स्थानावर 


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 89.5 अब्ज आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2023 मध्ये 2.34 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. टेस्ला आणि ट्वीटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क अजूनही श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 228 अब्ज डॉलर्स आहे. दुसर्‍या स्थानावर Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव आहे, ज्यांची एकूण संपत्ती 171 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 167 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Richest Man: पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? नेमकी किती त्यांची संपत्ती...