मुंबई: स्मार्ट टीव्ही घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्याकडे संधी चालून आली आहे. 16 मार्च ते 20 मार्च पर्यंत Flipkart Electronic Sale सुरू राहणार आहे. त्यात स्मार्ट टीव्हीसाठी आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये Thomson ब्रॅंडचे स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. जाणून घ्या या ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल.


भारतातील स्मार्ट टीव्हीच्या बाजारात थॉमसन या ब्रॅंडने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. थॉमसन स्मार्ट टीव्ही ब्रॅंड हा मागील तीन वर्षांतील भारतातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ऑनलाइन वस्तू विकणारा ब्रॅंड बनलेला आहे. SPPL(थॉमसन) चे सीईओ अवनीत सिंहांच्या मते, 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही 100 टक्के महसूल मिळालेला आहे. 2021-2022 मध्ये 7,50,00 पेक्षा जास्त टीव्ही विकले जाऊ शकतात. Flipkart Electronic Sale मध्ये थॉमसनने आपल्या स्मार्ट टीव्हीवर नवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. या सेलमध्ये थॉमसनचे 55 इंचाचे 4Kचे  स्मार्ट टीव्ही फक्त 35,499 मध्ये खरेदी करता येणार आहेत. 


7,999 रुपयांपासून सुरू होते किंमत
थॉमसनकडे सध्या 24 इंचापासून ते 75 इंचापर्यंतच्या आकाराचे टीव्ही उपलब्ध आहेत. त्याची किंमत 7,999 पासून 1,03,999 रुपयांच्या दरात आहे. 55 इंचाच्या आकारातला थॉमसन 55PATH5050 हा स्मार्ट टीव्ही सगळ्यात कमी किंमतीत उपलब्ध आहे. हा टीव्ही फ्लिप्कार्टवर 35,499 किंमतीत उपलब्ध आहे. हा एक 4K स्मार्ट टीव्ही आहे. तसेच तो अँड्रॉइड 9.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. चांगल्या आवाजासाठी यात 24 W चे स्पीकर्स देण्यात आले आहेत. याचा रिफ्रेश रेट 60HZ आहे. काही अॅप्सची सुविधा यात आधीपासूनच ग्राहकांना उपलब्ध असते. या व्यतिरिक्त यात ब्लूटूथ 5.0, ड्यूल बॅंड वाय-फाय, बिल्ट इन क्रॉमकास्ट देण्यात आलं आहे. तसेच टीव्हीला 3HDMI, 2USB, एअरप्लेचा सपोर्ट मिळतो. 


या टीव्ही ब्रॅंड्सवरही मिळतील ऑफर्स
सेलमध्ये रिअलमी, एमआय, सॅमसंग, एलजी, वनप्लस, पॅनासोनिक, नोकिया आणि कोडक सारख्या स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट देण्यात आलं आहे. तसेच या सेलमध्ये HDFC कार्डच्या ग्राहकांना क्रेडिट/ डेबिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे.