Least crowded countries: पूर्वीपेक्षा आत्ताच्या काळात कुठेही प्रवास करणं सोपं झालं आहे. कारण वाहने रस्ते अशा प्रकारच्या सर्व सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं लोक आता जगाच्या कामाकोपऱ्यात जाऊ शकतात. अनेक लोक दरवर्षी पर्यटनासाठी बाहेर जात असतात. तुम्ही कुठेही जाल तिथे तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. मात्र, अजूनही काही अशी ठिकाणे आहेत, जिथं मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत नाही. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीनं ही ठिकाणे खूप सुंदर आहेत. जाणून घेऊयात या पाच देशांची यादी जिथं तुम्ही एकदा भेट दिलीच पाहिजे.


जॉर्जिया (Georgia)


जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कॉकासस पर्वतावर बर्फाच्छादित शिखरांपासून ते शांत समुद्रकिनारे पाहायला मिळतात. त्याठिकाणी ऐतिहासिक वास्तुकला पाहायला मिळतात. 


भूतान


पूर्व हिमालयात वसलेले भूतान हे नयनरम्य दृश्यांनी परिपूर्ण आहे. सकल राष्ट्रीय आनंदाला जीडीपीपेक्षा प्राधान्य देत, हे राज्य समृद्ध पारंपारिक संस्कृती आणि चित्तथरारक भूदृश्यांचे मिश्रण आहे. भूतानमध्ये तुम्ही हिरव्यागार दऱ्यांतून ट्रेक करू शकता. येथील पर्वत तुम्हाला कधीही आश्चर्यचकित करू शकतात.


मादागास्कर


मादागास्कर हे अतिवास्तव दृश्यांसाठी ओळखले जाते. मादागास्कर निसर्गाची आवड असलेल्या सर्वांसाठी एक स्वर्ग असू शकते. बाओबाब्सचा प्रतिष्ठित अव्हेन्यू पाहणे असो किंवा अंदासिबे-मंताडिया नॅशनल पार्क हे पाहण्यासारखे आहे. त्यामुळं तुम्ही  मादागास्करला एकदा अवश्य भेट द्या. 


ओमान


ओमान हा देश पर्यटकांना आकर्षित करणारा देश आहे. ओमान हा अरबी द्वीपकल्पातील शांतताप्रिय देश आहे. इतिहास आणि परंपरेने समृद्ध देश आहे. ओमानमध्ये प्राचीन किल्ले आणि आधुनिक वास्तुकला यांचे मिश्रण आहे. विस्तीर्ण वाळवंट, खडबडीत पर्वत आणि मूळ समुद्रकिनारे यांनी भरलेल्या या देशातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळतात. 


श्रीलंका


श्रीलंका हा भारताच्या शेजारी असणारा छोटा देश आहे. चहुकडून समुद्राने वेढलेला असल्यामुळे हा देश एक बेट आहे. मात्र निसर्गाने या देशाला अत्यंत भरभरुन दिले आहे. याची प्रचिती श्रीलंकेत हिंडताना पदोपदी येते. हिरव्यागार चहाच्या बागांपासून ते सोनेरी समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सर्व काही इथं पाहायला मिळते. 


महत्त्वाच्या बातम्या:


 Lakshadweep : तुम्हालाही करायचीये लक्षद्वीपची सफर? प्रवासाचे कोणते पर्याय उपलब्ध, कसा आनंद लुटता येणार? जाणून घ्या सविस्तर