Poverty in Pakistan : सध्या पाकिस्तान (Pakistan) मोठ्या आर्थिक संकटाचा (Financial crisis) सामना करत आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्यामुळं नागरिकांची चिंता वाढलीय. अशातच जागतिक बँकेनं (World Bank) पाकिस्तानबाबत मोठी चिंता व्यक्त करणारा अहवाल सादर केलाय. पाकिस्तानमध्ये आणखी गरिबी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच 1 कोटीहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केलीय. वाहतुकीचा खर्च, राहणीमानाचा खर्च यामुळं  वाढलाय. वाढत्या खर्चामुळं पाकिस्तानात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केलीय. 


भारताची वाटचाल मजबुतीकडे तर पाकिस्तानची स्थिती नाजूक


जागतिक बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीय. पाकिस्तानात गरिबी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे येत्या आर्थिक वर्षात भारताची स्थिती अधिक मजबूत होणार असल्याचा अंदाजही जागतिक बँकेनं व्यक्त केलाय. दिवसेंदिवस पाकिस्तानवरील आर्थिक संकट अधिक गडद होताना दिसत आहे. त्यामुळं पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय. पाकिस्तानचा विकासाचा वेग मंदावलाय. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, पाकिस्तानचा विकासाचा दर 1.8 टक्के आहे. तर महागाईचा दर 26 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानचे पुरसे प्रयत्न नाहीत


पाकिस्तानच्या स्थितीबाबतचा अहवाल हा सय्यद मुर्तझा मुझफ्फरी यांनी लिहला आहे. त्यांच्या मत पाकिस्तान आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा गरिबीचं निर्मुलन करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही.  सध्या पाकिस्तानात 40 टक्क्यांच्या आसपास गरिबीचं प्रमाण आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती जागतिक बँकेच्या अहवालत व्यक्त केलीय. त्यामुळं स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.  


पाकिस्तानात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची शक्यता


पाकिस्तानातील महागाई दर हा 30 टक्क्यांच्या वर गेला आहे. तसेच राहणीमानाचा खर्च वाढलाय, वाहतुकीचा मोठा खर्च वाढल्याचे जागतिक बँकेचे अहवालात सांगण्यात आलंय. तसेच येत्या काळात पाकिस्तानात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य सेवेच्या संदर्भात  देखील स्थिती बिकट होण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केलीय.


आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी IMF पाकिस्तानला करणार मदत


दरम्यान, या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी IMF पाकिस्तानला आर्थिक मदत करणार आहे. पाकिस्तानला 9000 कोटी रुपयांची मदत करण्याचा विचार IMF च्या विचारधीन असल्याची माहिती मिळतेय. या मदतीतून पाकिस्तानला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पाकिस्तान संकटात! IMF कडून मिळणार 9000 कोटींची मदत, आर्थिक स्थिती नाजूक