Diego Maradona: तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्जेंटिनाचा विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोना यांच्या नावाचा ब्रँड परवाना करारांतर्गत भारतात प्रवेश करण्यास तयार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या ब्रँड अंतर्गत, बाजारात फॅशन, खेळ, जीवनशैली, ग्राहकांसह इतर काही विभागांची उत्पादने लॉन्च करण्याची शक्यता आहे.



या श्रेणींमध्ये उत्पादने विकली जातील


कंपन्यांसोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे 'मॅराडोना' ब्रँडला विविध उत्पादन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत आणेल असं ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन गोयल यांनी सांगितले. 'मॅराडोना' ब्रँडचे मालक सात्विका एसए यांनी आम्हाला त्यांचे खास भारतीय भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियाला गेल्या महिन्यात अधिकृतता प्रमाणपत्र जारी करण्यात आले. कंपनी फॅशन, जीवनशैली, ग्राहक उत्पादने, क्रीडा आणि इतर उद्योगांमधील 60 हून अधिक जागतिक ब्रँड्सचे व्यवस्थापन करते.

ब्रँड नावाने उत्पादने लवकरच बाजारात


कंपनी मॅराडोना मालाच्या संभाव्य भागीदारीसाठी आम्ही मोठ्या फॅशन कंपन्या आणि ई-कॉमर्स रिटेलर्सशी चर्चा करत आहोत. भागीदारी ऑफरिंग प्लॅननुसार ही उत्पादने उपलब्ध करून दिली जातील. आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रदेशाकडे किंवा राज्याकडे पाहत नाही, तर तरुण आणि क्रीडाप्रेमी आमचे लक्ष्य ग्राहक असतील. मॅराडोना ग्रँडची उत्पादने बाजारात येण्यासाठी 3-4 महिने लागतील आणि भारतातील ही मोहीम दीर्घ कालावधीची असेल, असे ते म्हणाले. मात्र, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सात्विका एसए यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले,


मॅराडोना स्पोर्ट्स आयकॉन


भारतातील ब्रँडच्या शक्यतांबाबत अर्जेंटिनाचे फॅबियन ओलेमबर्ग यांनीही स्पष्टीकरण दिलं. मॅराडोना हे क्रीडा जगताचे आयकॉन होते. त्यांच्या नावानेच त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक आकांक्षा निर्माण होतात. त्यांच्या सर्व श्रेणींमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. Fabian Olemberg येथे ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियासह मॅराडोना ब्रँडसाठी एजंट म्हणून अधिकृत आहे.

मॅराडोना महान फुटबॉलपटूंपैकी एक


अर्जेंटिनाला 1986 चा विश्वचषक जिंकून देण्यात मॅराडोना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सर्व काळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जातात. दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना रविवारी रोमहर्षक लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून 36 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता बनला आहे.