Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. येत्या 18 जूनला म्हणजे मंगळवारी शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) वारणसी येथून हा हप्ता शेतखऱ्यांच्या खात्यात वितरीत करणार आहेत. यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपये हस्तांतरीत करणार आहेत. याचा देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली.


9.26 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ  मिळणार


दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केल्यापासून केंद्र रकारनं देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. 18 जून रोजी 17 हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातूर सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येत चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता वितरीत केला जातो. 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ  मिळणार आहे.  


तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येणार


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या PM-किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी करतील.
मोदी स्वयं-सहायता गटांच्या (SHGs) 30,000 हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील देतील ज्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.


पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले


पंतप्रधान मोदींनी गेल्या दोन टर्ममध्ये शेतीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, मोदीजींनी सर्वप्रथम PM-किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी करण्यासंबंधीच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याचे चौहान म्हणाले. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. योजना सुरू केल्यापासून केंद्राने देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केल्याचे चौहान म्हणाले. दरम्यान, वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे विविध मंत्री सहभागी होणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


PM किसानचा 17 वा हप्ता मिळवायचाय? मग हे महत्वाचे काम आजच पूर्ण करा, अन्यथा....