Ravikant Tupkar : एकीकडं सोयाबीन (Soybean) आणि कांदा (onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) सरकारनं दिलासा दिला आहे. तर दुसऱ्या बाजुला 24 तासातच खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible Oil Price) वाढ झाली आहे. राज्यात खाद्यतेलांच्या (Ravikant Tupkar) किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनी थोडी फार कळ सोसावी असे तुपकर म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानंतर 24 तासातच खाद्य तेलांच्या किंमती वाढतात कशा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


कच्च्या तेलावर आयात शुल्क वाढवून 20 टक्के केलं आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा करताच 24 तासाच्या आत राज्यातील खाद्य तेलाचे भाव मात्र 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढवले जात आहेत. यामुळं मात्र शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी सर्व सामान्यांना मात्र आता खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावामुळे दणका बसला आहे.


शेतकऱ्यांच्या खिशात जर चार पैसे येत असतील तर कुणाच्या पोटात दुखायला नको


शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर 24 तासातच खाद्यतेलांच्या किंमती वाढल्या यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या खिशात जर चार पैसे येत असतील तर कुणाच्या पोटात दुखायला नको..! जर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असेल तर सर्वसामान्यांनी थोडीफार कळ सोसायलाच पाहिजे असे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानंतर 24 तासातच खाद्यतेलांच्या किमती वाढतातच कशा ? यामागे व्यापाऱ्यांची एक विशिष्ट लॉबी काम करत आहे? आपण मॉलमध्ये गेलो, बियर बारमध्ये गेलो तर भाव करत नाही. मात्र, शेतकऱ्यांचं भलं होत असेल तर या लोकांच्या पोटात दुखतं. सरकारने दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवाव्यात असे तुपकर म्हणाले. 


अचानक खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकाला झळ


आज अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकाला याची झळ बसली आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारनं ती मागणी मंजूर केली आहे. केंद्र सरकारकडून कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यां पर्यंत वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के वाढवण्यात आलं आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी ही मागणी करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ