Gold Price : सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या आज पुन्हा घसरण झाली आहे. वायदा बाजारासह किरकोळ बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. तर किरकोळ बाजारात चांदीच्या दरात सुमारे 900 रुपयांची घसरण झाली असून, वायदे बाजारातही प्रति किलो 550 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.


आज कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे भाव कसे होते?


एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 139 रुपये किंवा 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याची किंमत 59934 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​राहिली. सोन्याच्या या किमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत. आज एमसीएक्सवर चांदीचा भाव 562 रुपये किंवा 0.78 टक्क्यांनी घसरून 71 हजार 333 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. हे दर डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.


आज किरकोळ बाजारात सोन्याचे दर काय?


24 कॅरेट शुद्ध सोने


24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज 59940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला असून कालच्या तुलनेत त्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली आहे. काल 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 99840 रुपयांवर बंद झाला.


24 कॅरेट सोने


24 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 59700 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने बंद झाले असून कालच्या तुलनेत त्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली आहे. काल हे सोने 59600 रुपयांवर बंद झाले होते.


22 कॅरेट सोने


आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 54905 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने बंद झाला असून त्यात 92 रुपयांची घसरण दिसून आली आहे. काल हे सोने 54813 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.


18 कॅरेट सोने


आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 44955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला असून त्यात 75 रुपयांची घसरण दिसून आली आहे. काल हे सोने 44880 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने बंद झाले.


14 कॅरेट सोने


आज 14 कॅरेट सोन्याचा भाव 35065 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला आहे. त्यात 59 रुपयांनी वाढ झाली आहे. काल हे सोने 35006 रुपयांवर बंद झाले.


किरकोळ बाजारात चांदीचे भाव


किरकोळ बाजारात चांदीच्या दरावर नजर टाकली तर आज तो 71324 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेली असून त्याच्या दरात 873 रुपयांची मोठी घसरण दिसून आली आहे. काल चांदीचा दर 72197 रुपये प्रति किलोवर बंद झाला.


महत्त्वाच्या बातम्या:


नववधुला एक तोळं सोनं, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट, तेलंगणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात एकापेक्षा एक मोठ्या घोषणा!