Piyush Goyal : भारत अन्नधान्य, डाळी, मसूर, भाज्या, फळे यांचा मोठा उत्पादक देश बनला आहे, याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कृषी उत्पादनांची महत्वाची भूमिका आहे. कृषी उत्पादनात आणि दर्जामध्ये झालेल्या वाढीबद्दल मंत्री पियुष गोयल यांनी आनंद व्यक्त केला. कृषी संबंधित उत्पादनांची निर्यात 50 अब्ज डॉलरच्या वर पोहोचल्याचे गोयल म्हणाले. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ(नाफेड) च्या सहकार्याने जागतिक डाळी महासंघाने आयोजित केलेल्या नाफेड- डाळी 2024 परिसंवादात ते बोलत होते.


डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ 


विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होऊन भारत कृषी संबंधित उत्पादनांचा 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या कृषी उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे. गेल्या एका दशकात शेतकऱ्यांची बांधिलकी आणि क्षमता यामुळं डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे उत्पादन 2014 मधील 171 लाख टनांवरुन 2024 मध्ये 270 लाख टनांवर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 


 एमएसपीमधून चांगल्या दराची हमी 


नाफेड आणि जीपीसीमधील भागीदारी वृद्धिंगत होत राहील आणि डाळींना केवळ भारताचेच अद्भुत खाद्य नव्हे तर जगाचे अद्भुत खाद्य बनवेल असे पीयूष गोयल म्हणाले. भारत डाळ विषयी बोलताना मंत्री गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना किफायतशीर दरात डाळी उपलब्ध करून देण्यासाठी भारत डाळ उपक्रम सुरू केला. सरकारनं खरेदी केलेल्या चणा डाळीची  भारत ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्री सुरु केल्यावर विक्रीला सुरूवात झाल्यापासून केवळ चार महिन्यांच्या आतच मसूर चणा बाजाराचा 25 टक्के भाग या डाळीने व्यापला आहे, असे त्यांनी सांगितले. किमान हमी भावासंदर्भात (MSP) गोयल म्हणाले की, आज आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लागवडखर्चाच्या वर 50 टक्के दराची हमी  एमएसपीमधून मिळत आहे. तसेच गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळत असल्याचे गोयल म्हणाले. विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होऊन भारत कृषी संबंधित उत्पादनांचा 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या कृषी उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे. तसेच गेल्या एका दशकात शेतकऱ्यांची बांधिलकी आणि क्षमता यामुळं डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे गोयल म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


गेल्या 10 वर्षांत डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या किती वाढली MSP