नवी दिल्ली: एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनकडून आर्थिक वर्ष 2024-25 साठी या आर्थिक वर्षासाठी खातेदारांच्या खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. काही खातेदारांच्या खात्यात व्याज जमा झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. केंद्र सरकारनं 22 मे 2025 रोजी चालू आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याज दराला मंजुरी दिली होती.
पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
तुम्ही सर्वप्रथम ईपीएफओच्या यूएएन पासबूक पोर्टलला भेट द्या. तिथं यूएएन आणि पासवर्ड नोंदवा. लॉगीन केल्यानंतर View Passbook पर्याय निवडा. यानंतर मेंबर पासबूक निवडा. तिथं तुम्हाला तुमच्या खात्यात किती व्याज जमा झालं आहे ते पाहायला मिळेल.
UMANG App वरुन देखील व्याज जमा झालं की नाही चेक करता येऊ शकतं. सर्व प्रथम UMANG App डाउनलोड करा. यानंतर EPFO च्या All Services पर्याय निवडा. इथं पासबूक चेक करा.तुम्हाला पीएफ बॅलन्स पाहायला मिळेल.
मिस्ड कॉल द्वारे बॅलन्स चेक करता येऊ शकतो. त्यासाठी मोबाइल नंबर यूएएन सह लिंक आणि सक्रिय असणं आवश्यक आहे. बँक खाते क्रमांक, आधार, पॅन कार्ड याद्वारे केवायसी केलेली असणं आवश्यक आहे. या गोष्टींची पूर्तता केली असल्यास ग्राहकांना 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास बॅलन्स समजू शकतो. मिस्ड कॉल झाल्यानंतर मेसेजवरुन शिल्लक रक्कम किती आहे याचा मेसेज फोनवर येतो.
एसएमएसद्वारे देखील पीएफ बॅलन्स चेक करता येतो
1- UAN एक्टिवेट आणि आधार, पॅन किंवा बँक अकाउंट सोबत लिंक असणं आवश्यक
2- एसएमएस रजिस्टर्ड मोबाइल नबंर वरुन पाठवावा लागेल.
3- eKYC यूएएन पोर्टलवरुन पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
4-7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN LAN असा मेसेज करा
5- UAN च्या जागेवर 12 डिजिट यूनिवर्सल क्रमांक नोंदवा
6- LAN च्या ठिकाणी तुमच्या भाषेचा संकेतांक नोंदवा, उदा. हिंदीसाठी HIN, मराठीसाठी MAR
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर शिल्लक रकमेचा एसएमएस मिळू शकतो.