नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरी बदलत असताना वीकेंड, सुट्टी आणि 60 दिवसांपर्यंतचा गॅप सर्व्हिस ब्रेक मानल जाणार नाही.  हा नियम कर्मचारी जमा लिंक्ड इन्श्युरन्स योजनेचे फायदे निश्चित करण्यासाठी वापरला जाणार आहे. या निर्णयाचा फायदा अशा प्रकरणांमध्ये मिळेल  ज्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे दावे  नामंजूर करेले जाते होते किंवा कमी रक्कम मिळत होते. याच कारण नोकरीतील छोटे- छोटे ब्रेक होतं. ईपीएफओनं 17 डिसेंबरच्या परिपत्रकात हा निर्णय जारी केला आहे. 

Continues below advertisement

EDLI क्लेम संदर्भातील दावे नाकारले जात असल्याचं ईपीएफओनं समोर आलं होतं. दोन नोकऱ्यांच्या मधील वीकेंड किंवा सुट्टी म्हणजे सेवेतील ब्रेक मानला जायचा. काही वेळा कर्मचाऱ्याच्या मृत्यूवेळी तो कामावर असला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा फायदा मिळत नव्हता. 

उदा. समजा कर्मचारी शुक्रवारी एखाद्या कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडतो आणि सोमवारी नव्या कंपनीला जॉईन करत असेल तर त्याची सेवा 12 महिन्यांची मानली जाते. मात्र, वीकेंडचा ब्रेक मानला जायचा. यामुळं कुटुंबाला ईडीएलआयचा फायदा मिळत नव्हता. 

Continues below advertisement

आता काय बदललं?

आता ईपीएफओनं स्पष्ट केलंय की छोटे गॅप सर्व्हिसचा भाग मानला जाईल.  दोन नोकऱ्यांच्या मधील शनिवार, रविवार किंवा निश्चित साप्ताहिक सुट्टीचा ब्रेक मानला जाणार नाही. राष्ट्रीय सुट्टी, राजपत्रित सुट्टी, राज्य सुट्टी इतर नजरअंदाज केल्या जातील.  मात्र, दोन्ही नोकऱ्यांमधील कालावधी सुट्टीचा असला पाहिजे.  जर एखादा कर्मचारी ईपीएफ कव्हर असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करत असावा आणि नोकऱ्यांमधील 60 दिवसांचा गॅप असेल तर तो सेवेतील ब्रेक मानला जाणार नाही. 

ईपीएफओनं ईडीएलआयनं  किमान पेआऊटची रक्कम 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम कायदेशीर वारसांना मिळेल. जर कर्मचाऱ्याची सरासरी पीएफ शिल्लक 50000 हजार रुपयांपेक्षा कमी असली तरी किमान शिल्लक रक्कम दिली जाईल.  

कोणाला फायदा मिळणार?

नव्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू शेवटच्या पीएफ काँट्रिब्यूशनच्या सहा महिन्याच्या आत झालेला असेल आणि तो कर्मचारी कंपनीच्या पे रोलवर असेल  तर त्याला ईडीआयएलचा फायदा मिळेल. 

नोकरदारांना आणि त्यांच्या कुटुंबांना हा निर्णय दिलासा देणारा आहे. छोट्या- मोठ्या तांत्रिक त्रुटींमुळं फायदा न मिळण्याची भीती यामुळं कमी होईल. वारंवार नोकरी बदलणाऱ्यांसाठी पीएफ संबंधांतील इन्शुयरन्स कव्हर सुरक्षित होईल.