EPFO New APP नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच खातेदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एका नव्या मोबाईल ॲपच्या निर्मितीवर काम करत आहे. ज्या ॲपमधून पीएफ खातेधारक यूपीआयद्वारे पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी निश्चित रक्कम काढता येईल. हे ॲप एप्रिल महिन्यात लाँच होणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार याचा उद्देश ईपीएफओच्या डिजीटल सेवा चांगल्या करणे हा आहे. पीएफची रक्कम काढण्यासाठी लागणारा अधिक वेळ कमी करण्यासाठी हे ॲप लाँच करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

नव्या ॲपवर ईपीएफओकडून काम सुरु

केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या स्तरावर एका प्रकल्पावर काम सुरु आहे. त्यानुसार ईपीएफच्या खात्यात ठराविक रक्कम शिल्लक ठेवून इतर रक्कम बँक खात्यातून काढता येऊ शकते. नव्या ॲपद्वारे पीएफ खातेदार त्यांच्या पासबुकमध्ये किती शिल्लक आहे ते देखील तपासता येणार आहे. सध्या पासबूकमधील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी यूएएनची वेबसाईट आणि उमंग ॲपचा वापर करावा लागतो. ईपीएफओचं नवं ॲप आल्यानंतर यूएएनच्या वेबसाईटवरुन आणि उमंग ॲपवरुन देखील शिल्लक रक्कम तपासता येणार आहे.  

ईपीएफओ सध्या यावेळी 100 डमी अकाऊंटवर सिस्टीमची चाचणी घेत आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी त्याची चाचणी केली जात आहे. सध्या पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास यूएएनच्या वेबसाईटवर लॉगीन करुन पीएफ क्लेम सादर करावा लागतो. काही क्लेम तीन दिवसात मंजूर केले जातात, तर काही क्लेम मंजूर होण्यात अधिक वेळ लागतो.  

Continues below advertisement

ईपीएफओनं ऑटो क्लेम सेटलमेंट पद्धतीनं पीएफ क्लेम मंजूर करण्याची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. खातेदार आजारपण, शिक्षण किंवा घर बांधणीसाठी पैसे काढू शकतात. त्यांना ती रक्कम लवकर मिळवण्यासाठी नव्या ॲपचा फायदा होईल. ईपीएफओच्या सदस्यांची संख्या 8 कोटी इतकी आहे. करोनाच्या काळात ऑटो क्लेम सेटलमेंट यंत्रणा सुरु करण्यात आली होती. पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी सध्या क्लेम दाखल करावा लागतो. यूपीआय आधारित नवी यंत्रणा असलेलं ॲप एप्रिलमध्ये लाँच केलं जाणार आहे. या ॲपचा खातेदारांना फायदा होणार आहे.