Mangal prabhat Lodha office in BMC: मुंबई महापालिका मुख्यालयातील शिक्षण समितीच्या कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) यांना कार्यालय देण्यात आले होते. पालिकेत नवीन महापौर बसल्यानंतर हे कार्यालय आता बंद केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेत गेल्या तीन वर्षात कोणाचीही सत्ता नव्हती, प्रशासक मुंबईचा कारभार हाकत होते, तेव्हा मुंबई महापालिकेच्या (BMC) इतिहासात पहिल्यांदाच, जुलै 2023 मध्ये उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय पालिका मुख्यालयात सुरू करण्यात आले होते . यानंतर, शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही कार्यालय येथे सुरू करण्यात आले आहे होतं. नागरिकांच्या समस्या थेट सोडवण्यासाठी या दालनांचा वापर केला जात होता. यापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे महापालिकेतील कार्यालय बंद करण्यात आले होते. आता मंगलप्रभात लोढा यांचेही कार्यालय बंद होणार आहे. (Mumbai Latest news)

Continues below advertisement

महापालिकेत नगरसेवक निवडून आल्याने प्रशासकीय रचना पुन्हा बदलत आहे. त्यानुसार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मंगलप्रभात लोढा यांचं कार्यालय बंद झाल्यानंतर शिक्षण समितीच्या कार्यालयाचा ताबा रिकामा होणार आहे. शिक्षण समितीचे कार्यालय नव्याने स्थापन होणाऱ्या शिक्षण समितीसाठी पुन्हा पूर्ववत दिले जाईल. महापालिकेतील जागांचा वापर आता केवळ महापालिका कामकाजासाठी होणार आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कामासाठी जागा उपलब्ध होईल. या निर्णयामुळे महापालिकेचे नियमित कामकाज अधिक सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. 

Mumbai BMC Office: मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयाची विभागणी

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे.  त्यापैकी एक भाग ठाकरेंच्या शिवसेनेला दुसरा भाग शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आला आहे. मंगळवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्ष कार्यालयाची पाहणी करण्यात आली. मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक पक्षाला कार्यालय मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती बघता शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट आहेत. त्यामुळे एकच शिवसेना असताना जे पक्ष कार्यालय मुंबई महापालिकेत होते, त्यामध्ये विभागणी करण्यात आली असून एक भाग हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देण्यात आला आहे तर याच कार्यालयाचा दुसरा भाग हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी देण्यात आला आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार पक्ष कार्यालयाची विभागणी केल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आला आहे.

आणखी वाचा

भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'