EPF Calculation: तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल तर तुमचा पीएफ तुमच्या मासिक पगारातून कापला जात असेल. ही रक्कम तुमच्या EPF खात्यात जमा केली जाते, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे मॅनेज केली जाते. EPF ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक कॉन्ट्रीब्‍युटरी रिटायरमेंट बेनिफिट योजना आहे. सरकार दर आर्थिक वर्षात पीएफवर व्याज जाहीर करते. FY23 साठी व्याज दर 8.15 टक्के आहे. ईपीएफ असं खातं आहे, ज्यामध्ये निवृत्तीपर्यंत हळूहळू मोठा निधी जमा होतो.


समजा, तुमचा मूळ पगार (+DA) 25,000 रुपये आहे आणि वय 25 वर्ष. तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत EPF मध्ये योगदान देऊ शकता. म्हणजेच, EPF खात्यात कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी तुम्हाला सरासरी 33 वर्षांचा कालावधी मिळतो. इथे असं गृहीत धरुयात की, कॉन्ट्रीब्युशन देण्याच्या संपूर्ण वर्षात, कर्मचार्‍यांच्या (ग्राहकांच्या) पगारातील सरासरी वाढ दरवर्षी 5 टक्के राहिली आणि वार्षिक व्याज दर 8.15 टक्के राहिला. म्हणजेच, EPF Calculation नुसार, निवृत्तीच्या वयात म्हणजेच, वयाच्या 58 व्या वर्षी, कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात 1.46 कोटी रुपयांचा निधी  (EPF Corpus) तयार होईल. यामध्ये कर्मचार्‍यांचं योगदान सुमारे 31 लाख रुपये असेल.


EPF Calculation


मूळ वेतन (Basic Salary) + DA = 25,000 ₹
सध्याचे वय = 25 वर्ष
सेवानिवृत्तीचं (Retirement) वय = 58 वर्ष
कर्मचारी मासिक योगदान (Employee Monthly Contribution) = 12 टक्के
एम्‍प्‍लॉयर मंथली कॉन्ट्रीब्‍युशन (Employer Monthly Contribution) = 3.67 टक्के
EPF वर व्याज दर = 8.15 टक्के प्रतिवर्ष
वार्षिक पगार वाढ = सरासरी 5 टक्के
58 वर्ष वयाचा मॅच्युरिटी फंड = 1.46 कोटी रुपये (कर्मचार्‍यांचे योगदान 30.62 लाख रुपये आणि एम्‍प्‍लॉयरचं कॉन्ट्रीब्‍युशन 9.36 लाख रुपये होते. म्हणजेच, एकूण योगदान 39.98 लाख रुपये होतं.)


(टीप: योगदानाच्या संपूर्ण वर्षासाठी वार्षिक व्याज दर 8.15 टक्के आणि पगार वाढ 5 टक्के म्हणून घेण्यात आली आहे.)


EPF कॉन्ट्रीब्‍युशनचे नियम नेमके काय? 


कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या (+DA) 12 टक्के रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. परंतु, एम्‍प्‍लॉयरचं कॉन्ट्रीब्‍युशनची 12 टक्के रक्कम दोन भागांमध्ये जमा केली जाते. एम्‍प्‍लॉयरचं कॉन्ट्रीब्‍युशनच्या 12 टक्के कॉन्ट्रीब्‍युशनपैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केली जाते आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम EPF खात्यात जाते.


जर पगार 25,000 रुपये असल्यास


कर्मचाऱ्यांचा मूळ पगार +DA = 25,000 रुपये 


EPF मध्ये एम्‍प्‍लॉयरचं कॉन्ट्रीब्‍युशन = 25,000 रुपयांपैकी 12 टक्के = 3000 रुपये
EPF मध्ये एम्‍प्‍लॉयरचं कॉन्ट्रीब्‍युशन = 15,000 रुपयांपैकी 3.67 टक्के = 917.5 रुपये


अशाप्रकारे, पहिल्या वर्षी 25,000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात एकूण मंथली कॉन्ट्रीब्‍युशन 3917.5 रुपये ( 3000 + 917 रुपये ) असेल. यानंतर, वार्षिक आधारावर पगारात 5 टक्के वाढ झाल्यामुळे, बेसिक आणि महागाई भत्ता त्याच प्रमाणात वाढेल. सोबतच ईपीएफचं योगदानही वाढेल. ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी या योजनेत सहभागी होणं अनिवार्य आहे. हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की, पेन्शन खात्यात जास्तीत जास्त योगदान फक्त 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर केलं जातं.


(टीप: EPF योगदानाद्वारे निवृत्ती निधीचा (Retirement Fund) हा आकडा स्थिर व्याज दर, सॅलरी ग्रोथ आणि कर्मचारी आणि कंपनीचे योगदान या आधारावर घेण्यात आला आहे. हे अंदाजासाठी आहे. आकड्यांमधील बदलामुळे, कॉर्पसमध्ये फरक होऊ शकतो.)