नवी दिल्ली : केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या आठवड्यात ईपीएफओ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25 टक्के व्याज खातेदारांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. ही प्रक्रिया आठवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. यामुळं देशातील 33.56 कोटी खात्यांमध्ये व्याज वर्ग केलं जाईल.
ईपीएफओकडून दरवर्षी खातेदारांच्या खात्यात व्याज वर्ग केलं जातं. केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या खातेदारांना किती टक्के व्याज द्यायचं याबाबतच्या शिफारशीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज वर्ग केलं जातं.
आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र सरकारनं 8.25 टक्के दराला 22 मे 2025 ला मंजुरी दिली आहे. त्यानंतर 6 जूनपासून ईपीएएफओकडून वार्षिक व्याज जमा करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या वर्षातील वार्षिक खाते अपडेशनची प्रक्रिया 13.88 लाख नियोक्त्यांसाठी आणि 33.56 कोटी सदस्य खात्यांची पूर्ण झाली आहे. ही आकडेवारी 8 जुलैपर्यंतची आहे. 13.86 लाख नियोक्त्यांकडील 32.39 कोटी खात्यांमध्ये 8 जुलैपर्यंत व्याज जमा करण्यात आलं आहे. ईपीएफओ नियोक्त्यांची वार्षिक खात्यांच्या अपडेशनची प्रक्रिया 99.9 टक्के आणि 96.51 सदस्य खात्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मनसुख मांडवीय यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरु झाली होती. व्याज जमा करण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती.यंत्रणेतील ऑप्टिमायझेशनमुळं या वर्षी व्याज जमा करण्यासंदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया जूनमध्येच बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले.
मनसुख मांडवीय यांनी म्हटलं राहिलेल्या खात्यांमध्ये व्याज येत्या आठ दिवसांमध्ये जमा केलं जाणार आहे. आर्थिक वर्ष 2025 साठी व्याज 8.25 टक्क्यांनी जमा केलं जाईल. केंद्र सरकारनं ईपीएफओकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मान्यता देत घेण्यात आला होता. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाची 237 वी बैठक 28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पार पडली होती. त्या बैठकीचं अध्यक्षपद मनसुख मांडवीय यांनी भूषवलं होतं.त्यानंतर वित्त मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ईपीएफओनं 8.15 टक्के व्याज दिलं होतं. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ईपीएफओनं 8.15 टक्के व्याज दिलं होतं. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याज दिलं होतं. त्यापूर्वी 2021-22 मध्ये 8.5 टक्के व्याज दिलं गेलं होतं. तर,1977-78 मध्ये 8.1 टक्के व्याज देण्यात आलं होतं.