Heavy Rain in Nagpur : नागपूरचा प्रमुख मार्ग मानल्या जाणाऱ्या रिंग रोडवरील पडोळे चौकपासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागली आहे. पडोळे चौक ते राधे मंगलम कार्यालय दरम्यान रिंग रोडची एक बाजू पूर्णपणे जलमय झाली असून त्या बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणी साचण्याची समस्या कायम असून वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिकेकडून परिणामकारक उपाय योजले जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप हाऊस आज सुरू आहे की नाही, यासंदर्भात नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. 

दुसरीकडे नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर हे देखील ग्राऊंड झिरोवर उतरले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पांढूरणा गावात पोहोचले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडून ठिकठिकाणी पुर परिस्थितीची पाहणी केली जात आहे.  तर प्रशासन देखील अलर्टवर आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पावसाच्या स्थितीचा आढावा

नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नाल्याचा पाणी लोकांच्या घरात शिरलं, घरगुती साहित्याचा मोठं नुकसान

नागपूरच्या सदिच्छा कॉलोनी जवळून वाहणाऱ्या नाल्याचा पाणी कॉलोनीतील अनेक घरांमध्ये शिरल्यामुळे रहिवाशांचे नुकसान झाले आहे. कोटुलवार कुटुंबीयांच्या घरी तळमजल्यावर गुडघाभर पाणी शिरल्यामुळे फ्रिजसह घरगुती साहित्याचा आणि साठवलेल्या धान्याचे मोठे नुकसान झाला आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास जेव्हा कुटुंबियांना जाग आली, तेव्हा घरात एक फुटापर्यंत पाणी शिरला होतं. त्यानंतर घरगुती साहित्य वाचवण्याची धडपड सर्व कुटुंबीयांनी केली आणि सर्व साहित्य उंचावर ठेवले. मात्र तरी ही अनेक वस्तू वाचवता आल्या नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या