Employees Provident Fund : ईपीएफओ (EPFO) खातेदारकांसाठी  (EPFO Account Holder) आनंदाची बातमी आहे... कारण तुमच्या ईपीएफ खात्यात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या व्याजाची रक्कम सरकार लवकरच जमा करणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) म्हणजेच ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती. जवळपास सात कोटी नोकरदारांच्या खात्यावर पीएफवरील व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने 2021-22 साठी व्याजाच्या रक्कमेची मोजणी केली आहे. जवळपास 72 हजार कोटी रुपये रुपये खात्यावर जमा होणार आहेत. ही रक्कम लवकरच खात्यावर जमा केली जाणार आहे. गतवर्षी सरकारने 70 हजार कोटी रुपये व्याज जमा केले होते. 


2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याज - 
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यांनी फायनान्स इन्वेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीसोबत चर्चा करुन 2020-21 वर्षासाठी 8.50 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या 15 टक्के इक्विटीमध्ये तर बाकी रक्कम Debt मध्ये जमा होते.  


कधी किती व्याजदर मिळाला?
FY14 आणि FY15 में ब्याज दर 8.75%
FY16 मध्ये व्याज दर 8.80 %
FY 17 मध्ये व्याज दर 8.65 %
FY18 मध्ये व्याज दर 8.55 %
FY19 मध्ये व्याज दर 8.65 %
FY20 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 21 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 22 मध्ये व्याज दर 8.1 %


असा तपासा तुमचा बॅलेन्स -  
पीएफ खात्यावरील बॅलेन्स तपासण्यासाठी EPFO च्या अधिकृत संकेतस्थाळाला epfindia.gov.in भेट द्या. संकेतस्थळावर गेल्यानंतर ई-पासबुक वर क्लिक करा.. त्यानंतर तुम्ही passbook.epfindia.gov.in वर जाल.. तिथे तुम्ही तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा ही माहिती भरा... त्यानंतर तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल.. 


16 जून पर्यंत खात्यावर जमा होतील पैसे -
गतवर्षी व्याजाच्या रकमेसाठी पीएफ खातेदारकांना सहा ते आठ महिन्यापर्यंत वाट पाहावी लागली होती. पण यंदा सरकारकडून व्याजाची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 16 जूनपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल. 2021-22 साठी जाहीर करण्यात आलेला 8.1 टक्के व्याजदर मागील 40 वर्षातील सर्वात कमी आहे.