Elon Musk wealth : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती आता 350 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. मस्कने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, एलन मस्कच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.


एलन मस्कची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलर्सच्या पुढे 


एलन मस्कची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. अब्जाधीशांची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलर्स पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोमवारी टेस्लाच्या समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे एलन मस्कची एकूण संपत्ती 10 अब्ज डॉलर्सहून अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत 124 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. तेव्हापासून, त्याच्या एकूण संपत्तीत 89 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे एलन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये 4 नोव्हेंबरपासून 47 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एलन मस्कची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. 


एलन मस्क 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता


जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, त्यांची एकूण संपत्ती आता 353 अब्ज डॉलर झाली आहे. आजपर्यंत एकही अब्जाधीश हे करु शकला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा जुना विक्रम मोडला होता. विशेष म्हणजे 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारा एलन मस्क हा एकमेव व्यक्ती आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याने पहिल्यांदा हे केले होते. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की जर ही गती अशीच सुरू राहिली तर या वर्षाच्या अखेरीस एलन मस्क संपत्तीत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.


10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ


ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, सोमवारी एलन मस्कच्या एकूण संपत्तीमध्ये 10.3 अब्ज डॉलर्स किंवा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत 124 अब्ज डॉलर्स म्हणजेच 54 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यापासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 89 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. 5 नोव्हेंबर रोजी, एलन मस्कची एकूण संपत्ती 264 अब्ज डॉलर होती.


टेस्ला शेअर्समध्ये बंपर वाढ


दुसरीकडे, टेस्ला शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 3.46 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 357.09 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. तर 4 नोव्हेंबरनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 47 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी कंपनीचे समभाग 242.84 डॉलरवर व्यापार करत होते. चालू वर्षात टेस्लाने गुंतवणूकदारांना 43.74 टक्के परतावा दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:


डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा फायदा, एलन मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 4 लाख कोटींची वाढ, टेस्लाच्या शेअर्सही सुसाट