मुंबई : अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) हे टेस्ला (Tesla) या कारनिर्मितीसाठी भारतात लवकरच मोठा प्लान्ट उभा करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी तयारीदेखील सुरू झाली आहे. टेस्लाकडून भारतात प्लान्ट उभारणीसाठी योग्य जागेचा शोध घेतला जात आहे. ही कंपनी भारतात आल्यावर हजारो नवे रोजगार निर्माण होणार आहेत. असे असतानाच आता टेस्ला कंपनीने टाटा उद्योग (Tata Group) समुहाशी मोठा आणि महत्त्वाचा करार केला आहे. या करारामुळेदेखील देशात मोठी राजगारनिर्मिती होणार आहे. 


एलॉन मस्क पंत्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार


एलॉन मस्क लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीच्या माध्यमातून टेस्ला या कंपनीच्या भारतातील आगमनावर शिक्कामोर्तबही होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते 22 एप्रिलनंतर भारतात येऊ शकतात. त्याआधी टेस्लाने कारनिर्मितीसाठी लागणाऱ्या सेमिकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी टाटा उद्योगसमूहाच्या टाटा इलेक्ट्रॉनिक या कंपनीशी करार केला आहे. या करारामुळे टाट इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीलाही मोठा फायदा होणार आहे. आगामी काही महिन्यांत हा करार पूर्णत्वास जाणार आहे. टेस्ला आणि टाटा इलेक्ट्रॉनिक यांच्यात झालेला हा करार किती रुपयांचा आहे, याबाबत मात्र अद्याप कोणतीही समोर आलेली नाही. मात्र  


टेस्ला भारतात अब्जो डॉलर्सची गुंतवणूक करणार


इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक चंडक यांनी या करारावर प्रतिक्रिया दिली आहे. या करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक कंपन्यांना फायदा होईल, असे सांगितले आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने नुकतेच या क्षेत्रातील 50-60 तज्ज्ञ लोकांना नोकरीवर घेतले आहे. दुसरीकडे टेस्ला ही कंपनी भारतात साधारण दोन ते तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते, असे सांगितले जात आहे. या गुंतवणुकीमुळे भारताच्या अर्थव्यवस्था वाढीला फायदा होणार आहे. तसेच रोजगारनिर्मितीदेखील होणार आहे. 


दरम्यान, सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी होता यावं यासाठी भारत सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी नियमांत काही बदल केले जात आहेत. वाहननिर्मिती क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी भारत सरकारने नुकतेच 35 हजार डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची ईव्ही वाहने आयात करण्यासाठी 15 टक्के आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला.   


हेही वाचा :


सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!


इस्रायल-इराण युद्धाच्या स्फोटात भारतीय शेअर बाजार होरपळला, कंपन्यांच्या भांडवलात तब्बल 4.98 लाख कोटींची घट!


हो खरंय! सरकारची 'ही' योजना महिलांना दोन वर्षांत श्रीमंत करणार, करही वाचणार; एकदा वाचाच!