Elon Musk Apologized to Piyush Goyal : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest Man) आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता (Electric Car) कंपनी टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री (Minister of Textiles, Minister of Commerce and Industry) पीयुष गोयल (Piyush Goyal) यांची संपूर्ण जगासमोर जाहीर माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. पण, पीयुष गोयल यांच्या दौऱ्यावेळी एलॉन मस्क त्यावेळी तिथे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यानंतर त्यांनी ट्विट करून याबाबत माफी मागितली आहे.


एलॉन मस्क यांनी पीयुष गोयल यांची माफी मागितली


एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एलॉन मस्क यांनी भारताचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची माफी मागितली आहे. पण, असं नेमकं काय झाले की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला पीयुष गोयल यांची माफी मागावी लागली. या मागचं कारण काय जाणून घ्या.


टेस्ला कंपनी लवकरच भारतात येणार


केंद्रीय मंत्री पीयुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील अमेरिकन इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. मात्र, यावेळी एलॉन मस्क गैरहजर होते, ज्यामुळे त्यांनी ट्विट करत गोयल यांनी माफी मागितली आहे. महत्त्वाचं म्हणजे एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी लवकरच भारतात येणार आहे.






पीयूष गोयल यांचं ट्विट


पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, टेस्ला कंपनी भारतातून आपल्या वाहन घटकांची आयात दुप्पट करेल. पीयुष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट करत लिहिलं की, टेस्लामध्ये प्रतिभावान भारतीय अभियंते आणि वित्त व्यावसायिकांना वरिष्ठ पदांवर काम करताना पाहून छान वाटलं. मोटार वाहनांच्या क्षेत्रातील बदलामध्ये टेस्लाचे योगदान पाहून खूप आनंद झाला. यावेळी एलॉन मस्कच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त करत त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


गोयल यांच्यासाठी मस्क यांचं ट्विट


पीयूष गोयल यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना, एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, “पीयुष गोयल यांनी फ्रेमोंट प्लांटला भेट देणे हा सन्मान आहे. मी आज कॅलिफोर्नियाला पोहोचू शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे, पण मी भविष्यात तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे.”