Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांची दर मिनिटाला 1.18 कोटी रुपयांची कमाई आहे. याबाबतचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. एलन मस्क यांची प्रति तास कमाई ही 71 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, या अहावालावर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एलन मस्क यांनी या अहवालाला स्टुपिड मॅट्रिक्स असं नाव दिलं आहे. 


अशा अहवालांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही


दर मिनिटाला एलन मस्क यांची 1.18 कोटी रुपयांची कमाई असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. मात्र, एलन मस्क यांनी या अहवालाचे खंडन केलं आहे. कमाईऐवजी मोठे नुकसान सहन करावं लागत असल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा टेस्लाचे शेअर्स पडतात तेव्हा जास्त पैसे गमवावे लागत असल्याची प्रतिक्रिया एलन मस्क यांनी दिली आहे. अशा अहवालांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हा रोख रकमेचा मोठा भाग नाही. खरे तर ही रक्कम कंपन्यांच्या स्टॉक्सच्या स्वरुपात असून, या कंपन्या तयार करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.


अवहालात करण्यात आलेला दावा


एलन मस्क म्हणाले की, टेस्लाच्या स्टॉकमध्ये घसरण झाल्यावर प्रत्येक वेळी अधिक नुकसान सहन करावे लागते. दरम्यान, अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, एलन मस्कची एकूण संपत्ती ही तीन वर्षांत सरासरी 2 हजार 378 डॉलर प्रति सेकंदाने वाढली आहे. एलन मस्क हे दर मिनिटाला 142,680 डॉलर किंवा प्रति तास 8,560,800 डॉलर कमाई करतात. एलन मस्क हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात त्यावेळी त्यांची कमाई ही 68,486,400 डॉलरने वाढलेली असते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.


या वर्षी संपत्तीत विक्रमी वाढ 


टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओंच्या एकूण संपत्तीत जानेवारी ते जून या कालावधीत 96.6 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. सध्या, एलन मस्क हे 248.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एलन मस्क यांची सध्या टेस्लामध्ये 23 टक्के भागीदारी आहे. त्याच्या संपत्तीचा एक महत्त्वपूर्ण भाग, अंदाजे दोन तृतीयांश, टेस्लाच्या यशाशी जोडलेला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये मस्कने 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Elon Musk : 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता कोणत्याही फोन नंबरशिवाय X वर ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येणार