E-Shram Portal: तुम्हीही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारकडून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांना पूर्ण 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो. यासोबतच दरमहा ५०० रुपयांचा हप्ताही दिला जातो. तुम्ही या सरकारी पोर्टलवर नोंदणी करणार असाल तर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. सध्या लाखो लोक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा


या पोर्टलला घेऊन फसवणुकीचे काही प्रकार समोर आले आहेत. पीआयबीने ट्वीटरवर म्हटले की, ई-श्रम योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याशिवाय, इतर कोणत्याही पोर्टलवर याची नोंदणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


पीआयबीने केले ट्वीट 


PIB Fact Check ने ट्वीट करून म्हटले की,  ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताना फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा! नोंदणीसाठी, फक्त ई-श्रमच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.






 


नोंदणीसाठी अधिकृत पोर्टल: https://eshram.gov.in


ई-श्रम म्हणजे काय?


हा एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. देशभरातील असंघटित कामगारांसाठी सामजिक कल्याणकारी योजनांची प्रभावी, चांगली आणि सुलभ अंमलबजावणी करण्यासाठी मदत करतो.


ई-श्रमसाठी नोंदणी कशी करावी?


असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही कामगार ई-श्रम पोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन नोंदणी करू शकतो.


ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील का?


ई-श्रम पोर्टलवर नोंदणी विनामूल्य आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. नोंदणीसाठी तुम्हाला फक्त ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत पोर्टल http://eshram.gov.in वर जावे लागेल. याशिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14434 वर संपर्क साधू शकता. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha