नवी दिल्ली : केंद्र सरकारने टेलिकॉम फ्रॉड रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार संचारसाठी पोर्टलवरील आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 3.4 कोटी मोबाईल फोन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. तर 3.19 लाख आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यात दूरसंचार विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा च्या मदतीने 16.97 लाख व्हाट्सअप अकाउंट बंद केले आहेत.

Continues below advertisement


ग्रामविकास राज्यमंत्री पी. चंद्रशेखर यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार संचार साथी अभियानाद्वारे 20000 पेक्षा जास्त मेसेज पाठवणाऱ्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात आला आहे


संचार साथी पोर्टलवर लोक Chakshu सुविधेद्वारे  फसवणुकीचे कॉल्स आणि मेसेजला रिपोर्ट करता येईल. मात्र, डीओटीकडून तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी लोकांकडून मिळालेल्या डेटाचं विश्लेषण केलं जातं आणि टेलिकॉम संसाधनांना पकडतं.या यंत्रणेद्वारे मोठ्या संख्येनं गैरप्रकारांना टार्गेट केलं जातं. 


मंत्र्यांनी म्हटलं की एआय आणि बिग डेटा मुळं खोटी कागदपत्रं दिली असतील त्यांची ओळख पटवण्यात येते. याशिवाय  डीओटी आणि टेलिकॉम कंपन्यांनी एक यंत्रणा बनवली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पूड कॉल्स रिअल टाईम्सला पकडून रोखले जातील. 


टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडर्सकडून 1150 लोक किंवा संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. 18.8 लाखहून अधिक संसाधनांना  डिस्कनेक्ट करण्यात आलं आहे.यामुळं ऑगस्ट 2024 मध्ये अनरिजस्टर्ड टेलीमार्केटर्सच्या तक्रारीची संख्या 189419 होती.  ती जानेवारी 2025 मध्ये घटून 134821 वर आली. 


ट्रायनं 12 फेब्रुवारी 2018 ला TCCCPR  मध्ये बदल करण्यात आलो. त्यामुळं ग्राहक आता वाणिज्यिक संभाषणासंदर्भातील  तक्रारी 7 दिवसात तक्रार करु शकतो. यापूर्वी तो कालावधी 3 दिवस होता.  


डीओटी आणि ट्रायकडून टेलिकॉम फ्रॉडला पूर्णपणे संपवण्यासाठी पावलं उचलली जात हेत.तुम्हाला फेक कॉल आणि मेसेज आला तर संचार साथी पोर्टलवर रिपोर्ट करा. यामुळ नागरिकांना सुरक्षित टेलिकॉम ची सोय उपलब्ध होईल. यामुळं ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळेल. 


इतर बातम्या : 


Indrajit Sawant : 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो? हे गृह खात्याचं अपयश; इंद्रजित सावंतांचा घणाघात