Indrajeet Sawant कोल्हापूर : प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) हा दुबईला पळून गेल्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळत आहे. मात्र अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटक व्हायला हवी होती. या प्रकरणाला आता जवळ जवळ एक महिना पूर्ण होत आला आहे. कायद्याचं संरक्षण नसताना आणि गुन्हे दाखल असताना देखील असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो तर हे गृह खात्याचं अपयश आहे. अशी टीका इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत  (Indrajeet Sawant) यांनी केला आहे.  

Continues below advertisement

शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये,अशी अपेक्षाही इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली आहे. 

कोरटकरचा आयुष्यात कधी संबंध नाही, मग माझा मोबाईल नंबर कोणी दिला?

 इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार आहे. मात्र, पोलिसांना अद्याप त्याला पकडता आलेले नाही. त्यामुळे पोलिसांची याप्रकरणातील भूमिका आणि तपास संशयास्पद असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता नागपूर आणि कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर यांना मदत केली असावी, असा संशयही व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना इंद्रजित सावंत म्हणाले की, शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मदत करणारी प्रवृत्तीला शोधून त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे.

Continues below advertisement

 कारवाई करणं गृहमंत्र्यांचे काम आहे. त्यांनी याकडे लक्ष द्यावं, असं मला वाटतं. किंबहुना माझा आणि प्रशांत कोरटकरचा आयुष्यात कधी संबंध आला नव्हता. मग त्याला माझा मोबाईल नंबर कोणी दिला? हे देखील शोधण्याचा भाग आहे. एक महिना झाला तरी अद्याप कोरटकरचा मोबाईल तपासला गेला नाही. एक महिना झाला आता माझी आशा कमी होत चालली आहे.  

कोरटकरला वाचवण्यासाठी कोणती तरी यंत्रणा प्रयत्न करतेय - इंद्रजित सावंत

वकील असीम सरोदे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काही पुरावे असतील तर ते वेळ आल्यावर समोर आणतील. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट घ्यावा, यासाठी पोलिसांना आम्ही अर्ज दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा त्याने अपमान केला आहे. यामुळे सर्व शिवभक्तांची मन व्यथित झालंय. अनेक आंदोलन झाली आहेत याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करावी. कोणती तरी यंत्रणा आहे ही या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका आहे, असेही  इंद्रजित सावंत म्हणाले. 

हे ही वाचा